युवतीला धमकाविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

दिवसाढवळ्या डोळ्यात स्प्रे मारून २६ लाखांची रोकड पळवली

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – महाविद्यालयीन युवतीला धमकाविणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका अल्पवयीन युवतीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका १७ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आणि युवती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपीने युवतीशी ओळख केली. दोघांमध्ये मैत्री झाली. दोघे समाज माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर युवकाच्या त्रासामुळे युवतीने त्याच्याशी असलेले संबंध तोडले. गेल्या आठ महिन्यांपासून युवक तिला त्रास देत होता. तिचा पाठलाग करायचा. महाविद्यालयात जाऊन त्याने तिला धमकाविण्यास सुरुवात केली. आरोपीच्या त्रासामुळे तिने सहकारनगर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

तरुणीला धमकावून बलाात्कार; एकाला अटक

तरुणीला धमकावून बलात्कार केल्या प्रकरणी एकाला वाघोली पोलिसांनी अटक केली. रवी राजकुमार कस्तुरे (वय २५, संत तुकारानगर, खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख झाली होती. आरोपीने तिला जाळ्यात ओढले. तरुणीला धमकावून त्यांना बलात्कार केला. पोलीस उपनिरीक्षक राघो तपास करत आहेत. दरम्यान, विवाहाच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी तरुणाविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×