टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

नगर रस्त्यावरील वाघोली भागातील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील ज्ञानेश्वर पाटील (वय ४०, रा. लोणीकंद, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पाटील यांचा भाऊ संदीप (वय ३७) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी टेम्पो चालक प्रदीप शिवेंद्र सिंग (वय ४०, रा. रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सिंग याला ताब्यात घेतले आहे.

बॅनर लावण्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला – सविस्तर बातमी 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सुनील पाटील हे गुरुवारी (९ ऑक्टोबर) दुपारी दीडच्या सुमारास वाघोली परिसरातून निघाले होते. कटकेवाडी फाटा चौकात भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार पाटील गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर टेम्पो चालक सिंग याला ताब्यात घेण्यत आले असून, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठवडभरात वेगवेगळ्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×