खूप दिवसापासून ची इच्छा पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीचे केले आभार व्यक्त
marathinews24.com
पुणे – स्वामी चिंचोली ग्रामपंचायतीचे वतीने भजनी मंडळ साहित्य, आराधी मंडळ,तसेच लेझिम पथक यांना साहित्य वाटप करण्यात आले. खूप दिवसापासून ची इच्छा पूर्ण झाल्याने भजनी मंडळ,आराधी मंडळ, लेझीम पथक यांनी ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले. भजनी मंडळाने देखील नवीन साहित्य आणि सेवा मिळाल्याबद्दल सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे अभिनंदन केले व मोठ्या आनंदाने पेटी तबला वाजून आनंद व्यक्त केला. यावेळी सरपंच पुनम मदने, उपसरपंच प्रकाश होले, ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे,सदस्य धनाजी मत्रे, रामचंद्र शिंदे, विजय काळे, राजेंद्र देसाई, जितेंद्र ढवळे, भागवत शेंद्रे, कमल शेंद्रे, सुभद्रा डोंगरे, बाळकृष्ण ढवळे, तात्याराम जगताप, ग्रामपंचायत कर्मचारी मोहम्मद शेख, लहू वेताळ आदी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
“स्वामीचिंचोलीतील भजनी मंडळ हे पंचक्रोशीतील प्रत्येक भजन स्पर्धेत अव्वल येत असते,अत्याधुनिक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे भजनी मंडळांचा सराव उत्तमरित्या होऊन स्वामीचिंचोली गावचा लौकिक वाढणार आहे”
-सौ.पूनम मदने सरपंच,स्वामीचिंचोली
“महाराष्ट्राला संतांची व वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे,गावातील भजनी मंडळाच्या माध्यमातून अध्यात्माकडे तरूण पिढीची वाटचाल होण्यास मदत होणार आहे”
-स्वाती लोंढे ग्रामपंचायत अधिकारीस्वामीचिंचोली























