Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

७८३ नागरिकांच्या तक्रारींचे जागेवर निवारण

On-site redressal of complaints of 783 citizens

 आमदार शंकर जगताप यांचा ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

marathinews24.com

पिंपरी चिंचवड – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप यांच्या पुढाकाराने थेरगाव येथे राबविण्यात आलेल्या “आमदार आपल्या दारी – संवाद, सेवा, समर्पण” या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात ७८३ नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आले, तर अनेक तक्रारींवर तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली.

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु – सविस्तर बातमी 

थेरगावमधील सोनाई मंगल कार्यालय येथे गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) आयोजित या शिबिरात प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचवणे हेच खरे जनसेवेचे उदाहरण आहे, असे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमात शासकीय योजना, दाखले, रेशनकार्ड, वीज, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, पर्यावरण, वाहतूक तसेच महापालिकेशी संबंधित विविध तक्रारींवर तत्काळ निर्णय घेण्यात आले. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार जगताप यांनी थेट सूचना दिल्या.

उपक्रमासाठी महापालिका आणि शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात नायब तहसीलदार मदन जोगदंड, मंडळ अधिकारी विष्णू भोसले, बाबासाहेब साळुंखे, अश्विनी गायकवाड, तलाठी एच.एम. चांदेकर, सचिनानंद माहुनकर, नवनाथ मोरे, साहेबराव थोरात, सुदर्शन पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे प्रकाश भोंडवे, महावितरणचे कार्यकारी अभियंता मुंडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर थोरात, पर्यावरण विभागाचे सोहन निकम, आरोग्य विभागाचे दरवडे, विद्युत विभागाचे शेळके, जलनिस्सारण विभागाचे मोमीन, नगररचना विभागाचे महेश तावरे, पाणीपुरवठा विभागाचे बरिदे, स्थापत्य विभागाचे हेमंत देसाई, बांधकाम परवानगी विभागाचे विजय सोनवणे, ग विभागाचे क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावर तसेच काळेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बहिरट आदी अधिकारी उपस्थित होते.

आमदार जगताप यांच्यासोबत नगरसेवक संदीप गाडे, नगरसेविका मनीषा पवार, अभिषेक बारणे, तानाजी बारणे तसेच पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे ७८३ नागरिकांच्या तक्रारींना प्रत्यक्ष प्रतिसाद मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी “आमदार आपल्या दारी” हा उपक्रम खर्‍या अर्थाने जनसेवा आणि प्रशासनातील पारदर्शकतेचे उदाहरण ठरल्याचे समाधान व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×