मांजरी बुद्रूक परिसरात घटना
marathinews24.com
पुणे – मॉन्जीनीज केक शॉपची शाखा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ६ लाख १५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १ जुलै ते १२ जुलै कालावधीत मांजरी बुद्रूक परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्लासच्या नावाखाली विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मांजरी बुद्रूक परिसरात राहायला असून, त्यांना केक शॉपची शाखा घ्यायची होती. त्यासाठी तरूणाने ऑनलाईनरित्या एकाचा संपर्क मिळवून १ जुलैला त्याला फोन केला. त्यावेळी संबंधिताने मॉन्जीनीज केक शॉपची शाखा देण्याचे आमिष दाखवून तरूणाला नोंदणीची रक्कम ऑनलाईनरित्या पाठविण्यास सांगितले. तब्बल ६ लाख १५ हजार रूपये जमा करूनही त्यांना मॉन्जीनीज केक शॉपची शाखा मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करीत आहेत.





















