रविवार पेठेतील घटना
marathinews24.com
पुणे – खरेदी करीत असलेल्या जेष्ठ महिलेकडील पर्सची चैन उघडून चोरट्यांनी २० हजारांची रोकड आणि सोन्याचे मंगळसूत्र असा १ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ९ ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील मनीष मार्वेâटमध्ये घडली आहे. याप्रकरणी चाकणमध्ये राहणार्या ६५ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पुण्यात देवीच्या मिरवणूकीत रथाला बसला करंट – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला चाकणमध्ये राहायला असून, खरेदीच्या निमित्ताने ९ ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजता रविवार पेठेत गेल्या होत्या. मनीष मार्वेâटमध्ये खरेदी करीत असताना चोरट्यांनी जेष्ठेला हेरले. त्यांच्या पर्समधील २० हजारांची रोकड आणि सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. काही वेळानंतर महिलेला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार गोपाल नारायण तपास करीत आहेत.
औंधमध्ये घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज चोरीला
घरात शिरूर चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने असा मिळून १ लाख ८४ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ८ ऑगस्ट ते ६ ऑक्टोबर कालावधीत औंधमधील आयटीआय रोडवर घडली आहे. याप्रकरणी तरूणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कुटूंबियासह औंधमधील आयटीआय रस्ता परिसरात राहायला आहेत. ८ ऑगस्ट ते ६ ऑक्टोबर कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटातील ४ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा १ लाख ८४ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार दांगडे तपास करीत आहेत.





















