Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पुण्यात वारजे, प्रभात रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले

पुण्यात बालिकेचा खून करुन आईची आत्महत्या

चोरट्यांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेले. वारजे आणि प्रभात रस्ता परिसरात या घटना घडल्या. किराणा माल विक्री करणाऱ्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना वारजे भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने वारजे माळवाडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुख्यात गुंड निलेश घायवळला मिळणार इंटरपोलची नोटीस – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीचे वारजे भागातील सिप्ला फाऊंडेशनजवळ असलेल्या पूजा हायलँड सोसायटीत तळमजल्यावर किराणा माल विक्री दुकान आहे. शनिवारी (११ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास दुकानात दूध खरेदीच्या बहाण्याने दोन चोरटे दुकानात शिरले. त्यावेळी महिला दुकानात एकटी होती. चोरट्यांनी पैसे देण्याचा बहाणा करुन महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चाेरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी वारजे परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक रायगौंडा तपास करत आहेत.

प्रभात रस्ता परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला प्रभात रस्त्यावरील कमला नेहरु उद्यानाजवळील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या शनिवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी सहाच्या सुमारास प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १४ परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटा दुचाकीवरुन पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहे.

नारायण पेठेत महिलेचा मोबाइल हिसकावला

नारायण पेठेत महिलेचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला नारायण पेठेतील गोगटे प्रशालेजवळ राहायला आहेत. त्या १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कामावरुन घरी जात होत्या. गोगटे प्रशालेजवळ त्यांनी दुचाकी लावली. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्लया चोरट्याने त्यांचा २५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. पोलीस हवालदार साळवे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×