Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

विभागीय लोकशाही दिनात दोन प्रकरणांवर सुनावणी

विभागीय लोकशाही दिनात दोन प्रकरणांवर सुनावणी

दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन 

marathinews24.com

पुणे – विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत आज झालेल्या विभागीय लोकशाही दिनात अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दोन प्रकरणांवर सुनावणी घेऊन अर्ज निकाली काढले.

‘पुणे आर्टिस्ट ग्रुप’चे महाचित्रप्रदर्शन – सविस्तर बातमी 

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे तसेच विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात येते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या दोन प्रकरणांवर यावेळी श्रीमती द्विवेदी यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. यात पुणे व सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याबाबत व घरकुलाच्या जागेत अतिक्रमण बाबत आदी तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×