सायबर चोरट्यांचा जेष्ठाला २० लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

पोलीस असल्याची केली बतावणी

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठाला तब्बल १९ लाख ८० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ९ ते १४ जुलै कालावधीत मध्यवर्ती फर्ग्युसन रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी अनंत कुलकर्णी वय ८८ यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीएमपीएल बसचालकाचा बेदरकारपणा दोघांच्या जीवावर – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुलकर्णी हे फर्ग्युसन रस्ता परिसरात राहायला आहेत. ९ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. आरोपी नरेश गोयल याने ५३८ कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. त्याने तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड वापरले आहे. आम्हाला तुमच्या बँकखात्याची तपासणी करायची असल्याची बतावणी केली. त्यानंतर साबयर चोरट्यांनी कुलकर्णी यांना विविध कारणांसाठी ऑनलाईनरित्या रक्कम वर्ग करण्यास सांगितली.

१९ लाख ८० हजार रूपये वर्ग केल्यानंतरही सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. संशय आल्यामुळे त्यांनी संबंधितांकडे सखोल चौकशी केली असता, त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रसाद राउत तपास करीत आहेत.

जास्तीच्या परताव्याचे आमिष, १० लाखांची फसवणूक

पुणे- शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला ऑनलाईनरित्या ९ लाख ७१ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १० मार्च ते ४ मे कालावधीत लोहगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी संबंधित तक्रारदाराने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आणि बँक धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लोहगावमध्ये राहायला असून, १० मार्चला सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइलवर लिंक पाठवली. तक्रारदाराचा विश्वास संपादित केल्यानंतर शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यामुळे तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरवात केली. तब्बल ९ लाख ७१ हजार रूपये गुंतवणूक करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधिताने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×