पीएमपीएल बसचालकाचा बेदरकारपणा दोघांच्या जीवावर

पीएमपीएल बसचालकाचा बेदरकारपणा दोघांच्या जीवावर

कात्रज घाटात तरूण-तरूणीला चिरडले

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात पीएमपीएल बसचालकांचा बेदरकापणा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे बसशेजारून वाहने चालवताना अनेकांना जीव मुठीत धरावा लागत आहे. अशाच एका बेदरकार पीएमपीएल बसचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणासह तरूणीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात १४ ऑक्टोबरला सकाळी साडेआठच्या सुमारास कात्रज घाट परिसरातील हॉटेल हवेलीसमोर घडला आहे.

येवले अमृततुल्यची ठाम भूमिका – आम्ही कोणताही कायदा मोडलेला नाही” – सविस्तर बातमी 

आकाश रामदास गोगावले (वय २४ रा. ससेवाडी, भोर) आणि अनुष्का प्रकाश वाडकर (वय १८ रा. ससेवाडी भोर ) अशी ठार झालेल्या तरूण-तरूणीची नावे आहेत. याप्रकरणी बस चालक सुधीर दिलीप कोंडे (वय ४४ रा. आरवी, हवेली ) याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण गोगावले वय ५९ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आकाश आणि अनुष्का एकाच गावातील रहिवाशी होते. ते भोर तालुक्यातील ससेवाडीत एकमेकांच्या शेजारी राहत होते. १४ ऑक्टोबरला सकाळी सव्वा आठच्या सुमारास आकाश हा शेजारी राहणार्‍या अनुष्काला दुचाकीवर घेउन पुण्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी भरधाव पीएमपीएल चालक सुधीर कोंडे याने आकाशच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान, आकशा गोगावले आणि अनुष्का वाडकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करीत आहेत.

दिवाळीत गावावर शोककळा, होतकरू मुले गेली

ऐन दिवाळीत पीएमपीएल बसचालकाने दुचाकीस्वार आकाशला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात आकाशसह सहप्रवाशी अनुष्काचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे ससेवाडी (ता. भोर) गावावर शोककळा पसरली असून, होतकरू मुले दगावल्यामुळे गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. बेशिस्त अन बेदरकार बस चालकामुळे दोघांना जीव गमवावा लागल्याचे बोलले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×