Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

बेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी

बेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार यांची मागणी; ‘एनएचएआय’ला निवेदन सादर

marathinews24.com

पुणे – बेलसर टोलनाक्यावर पुरंदर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश प्रमोद पवार यांनी केली. या मागणीचे निवेदन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (एनएचएआय) महासंचालक संजय कदम यांच्याकडे देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष लहुअण्णा निवंगुणे, पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष साहेबराव फडतरे, प्रदेश युवक सचिव विश्वजीत जाधव, जिल्हा युवक उपाध्यक्ष सुरज कारदगे, जिल्हा युवक सरचिटणीस सुजित शिंदे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावा – सविस्तर बातमी 

उमेश पवार म्हणाले, “पुरंदर तालुक्यातील जनतेवर अन्यायकारक पद्धतीने टोलचा बोजा टाकला जात असून, स्थानिक नागरिकांकडून वारंवार टोल वसुली केली जात आहे. स्थानिक नागरिकांना कोणतीही सवलत न देता त्यांची आर्थिक लूट सुरू आहे. हा प्रकार तात्काळ बंद करून स्थानिकांना संपूर्ण टोल माफी देण्यात यावी, अशी युवक काँग्रेसची ठाम भूमिका आहे. जर प्रशासनाने ही मागणी तात्काळ मान्य केली नाही, तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. टोल नाक्यावर रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मोर्चा तसेच लोकशाही मार्गाने मोठा लढा उभारला जाईल.”

तसेच सासवडमध्ये जाणारा व सासवडमधून बाहेर पडणाऱ्या दोन्ही प्रमुख मार्गांवर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत असल्याने त्या ठिकाणी पूल (ओव्हरब्रिज) उभारण्यात यावेत. सुकलवाडी व वागदरवाडी फाटा येथेही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक सुरळीत होण्यासाठी तात्काळ ब्रिज बांधण्यात यावा आणि जेजुरी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडी व गैरसोयीचा त्रास होत असल्याने, जेजुरी ओव्हरब्रिज तातडीने उभारण्यात यावा, या मागण्या युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आल्या. या सर्व मागण्यांबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शंभर टक्के तुमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करू, असे आश्वासन दिले.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×