Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात सहायक फौजदारासह हवालदार निलंबित

पुण्यात सहायक फौजदारासह हवालदार निलंबित

अवैध धंद्याना प्रोत्साहन दिल्याचे उघडकीस

marathinews24.com

पुणे – शहरातील कायदा सुव्यस्थेला बाधा निर्माण करणार्‍या अवैध धंद्येवाल्यांना हद्दपारीठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोहिम हाती घेतली आहे. मात्र, सहकानगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदारासह हवालदारानेच अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी दिले आहेत. सहायक पोलीस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड आणि हवालदार अमोल प्रकाश पवार अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. दोघेही तपास पथकात (डीबी ) कार्यरत असताना त्यांनी अवैध धंदे चालकाकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

वानवडी पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांना दणका – सविस्तर बातमी 

बापुसाहेब खुटवड आणि अमोल प्रकाश पवार हे सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकात (डीबी )कार्यरत होते. मार्च २०२६ मध्ये एका अवैध धंदेवाल्याकडून दोघेही पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. कर्तव्यावर असताना अवैध धंदे चालविणार्‍यासोबत प्रत्यक्ष संबंध व संपर्क ठेवणे, पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे चालविण्यास प्रोत्साहन देणे, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी आर्थिक देवाण-घेवाणीचे गैरवर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर बेशिस्त गैरवर्तणुक व कसुरीच्या अनुषंगाने मुंबई पोलीस ( शिक्षा व अपिले) नियम १९५६ मधील नियम ३ (१-अ) (१) (ब) च्या तरतुदीनुसार व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील नियम २५ अन्वये दोघांनाही उपायुक्त मोहिते यांनी निलंबित केले आहे.

सहकारनगर तपास पथकाला वरदहस्त

खुटवड आणि पवार हे सहकारनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत असताना त्यांनी अवैध धंदेवाल्यांना मदत केली. त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, हे पैसे त्यांनी कोणाकोणामध्ये वाटून घेतले का, यामध्ये तपास पथक प्रमुखासह, पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पैशांचे वाटप झाले आहे का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. दरम्यान, शहरात अवैध धंद्येवाल्यांविरूद्ध कठोर कारवाचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले असतानाही, खुटवड व पवारने कोणाच्या वरदहस्ताने वसुली केली. हद्दीत अवैध धंदेवाल्यांना सेट करून वसुलीचा पायंडा किती दिवसांपासून सुरू होता, याचीही चौकशीची मागणी होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×