Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

वानवडी पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांना दणका

वानवडी पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांना दणका

२८ लाखांच्या मुद्देमालासह सराईताला बेड्या

marathinews24.com

पुणे – शहरात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, वानवडी पोलिसांनी मोठ्या कारवाईत अमली पदार्थ (ड्रग्ज) आणि बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह सराईत फरार आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून २७ लाख ६० हजार रुपये किमतीचे ९२० ग्रॅम अमली पदार्थ, पिस्तुल, सात जिवंत काडतुसे असा २८ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अक्रम अजिज शेख (वय ३२, रा. गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

एनडीपीएस गुन्ह्यात फरार असलेला अक्रम शेख हा पुणे कॅम्प परिसरात येणार असल्याची माहिती वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कॅम्प परिसरात सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी करून त्याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना पांढऱ्या रंगाची २७ लाख ६० हजार रुपये किमतीची ९२० ग्रॅम अमली पावडर मिळून आली. त्याच्याकडे ४७ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल, दोन मॅगझीन आणि सात जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या सूचनेनुसार या कारवाईत पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फ़ाज शेख, पोलीस हवालदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, पोलीस अंमलदार अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अर्शद सय्यद, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, राहुल माने, महिला पोलीस अंमलदार सुषमा घोळवे आणि रक्षा राहुलकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीने हा माल कोठून आणला आणि त्याचे कोणाशी लागेबांधे आहेत, याचा सखोल तपास वानवडी पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×