Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू

डोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू

बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – शहरातील बाणेरमधील नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना १९ व्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी बांधकाम व्यावासयिकासह ठेकेदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. रागीब एहसान राकीब (वय १९, सध्या रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) असे मृत्युुमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत रागीब याचा भाऊ मोहमद एहसान राकीब (वय २१, सध्या रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसाायिक, तसेच ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोपवाटिका व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागीब आणि त्याचा मोठा भाऊ मोहमद हे बांधकाम मजू आहेत. गुरुवारी ( २३ एप्रिल) सकाळी साडेनऊच्या सुमारास बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर असलेल्या एका नियोजित गृहप्रकल्पातील १९ मजल्यावर रागीब काम करत होता. स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी पट्या लावत असताना १९ व्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम व्यावसायिक, तसेच ठेकेदाराने सुरक्षाविषयक उपाययोजना केला नव्हत्या ,तसेच संरक्षक जाळीही योग्यपद्धतीने लावली नसल्याचे दिसून आले. बांधकाम मजुराच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक थिटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×