Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

खुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

१० कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात रिलस्टारला बेड्या

नांदेड सिटी पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – हॉटेल चालकांकडून खंडणी उकळण्यासाठी तसेच पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणाचा बदला घेऊन खूनासाठी पिस्तूल बाळगलेल्या सराईत गुन्हेगाराला नांदेड सिटी पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त केले. चेतन संतोष थोरे (वय २३, रा. निवृत्तीनगर, वडगाव) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अपहरण, मारामारी, शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल आहे.

क्रेन ऑपरेटरवर हल्ला; फायनान्स रिकव्हरी एजंटसह तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी  

सिंहगड कॉलेज येथील हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्यासाठी त्याने पिस्टल आणल्याची कबुली त्याने दिली आहे. नांदेडसिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली दळवी फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिस अंमलदार प्रतीक मोरे, स्वप्नील मगर, निलेश खांबे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन थोरे याच्याकडे अग्निशस्त्र असून तो धायरीतील बारांगणी मळा येथे येणार आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी बारांगणी मळा येथे सापळा रचून चेतन थोरे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपयांचे गावठी पिस्टल मिळून आले. नांदेड सिटी पोलिस ठाण्यात त्याच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव, उपनिरीक्षक गणेश कसबे, दत्तात्रय सावंत राजेश गायकवाड, प्रतीक मोरे, स्वप्नील मगर, निलेश खांबे, संग्राम शिनगारे, सतीश खोत, राजू वेगरे, मोहन मिसाळ, अक्षय जाधव, अनिल बारड यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×