पोलीस आयुक्त अमितेशकुमार
marathinews24.com
पुणे -‘अल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे प्रमुख आव्हान पोलिसांसमोर आहे. शहराच्या वस्ती भागातील मुले, तसेच उच्चभ्रू वर्गातील मुलेही व्यसनांच्या आहारी गेले आहेत, ही बाब चिंतेची आहे’, असे स्पष्ट मत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टकडून अल्पवयीनांमधील व्यसनाधिनतेबाबत ‘संयम’ अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालाचे प्रकाशन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील, उपायुक्त डाॅ. सागर कवडे, ताराचंद रामनाथ ट्रस्टचे प्रमुख नंदकिशोर राठी, ज्ञानप्रबोधिनीचे अजित कानिटकर, ज्ञानप्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिकेच्या संचालिका डाॅ. अनघा लवळेकर, दर्शन मुंदडा या वेळी उपस्थित होते.
पालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण – सविस्तर बातमी
‘ अमली पदार्थांचे सेवन, मद्यप्राशनाचे परिणाम आरोग्य, कुटुंब, समाजावर होतो. अल्पवयीनांमधील व्यसनाधिनता ही चिंतेची बाब आहे. अमली पदार्थ विरोधी मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्याथ्यांचे समुपदेशन, तसेच प्रबोधन करण्यात येत आहे. अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री होते, असे भाग निश्चित करण्यात आले आहेत. अमली पदार्थांची विक्रीचा प्रकार आढळून आल्यास केवळ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई न करता थेट पुरवठादाराचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कष्टकरी, धनिक कुटुंबातील मुलेही व्यसनांच्या आहारी गेली आहेत, ही चितेंची बाब आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.
‘“संयम’अहवालात जी निरीक्षणे नोंदविण्यात आली. त्यादृष्टीने उपायोजना करणे गरजेचे आहे. पुण्यात पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाई केली. अपघात करणाऱ्या मुलाचे वडील दोन वर्ष कारागृहात होते. वाहतूक नियमभंगाचे प्रमाण युवकांमध्ये दिसून येत आहे. नियमभंगाचे प्रकार शहरातील वास्तवावर बोट ठेवतात, हे देखील विचारात घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत सहभागी व्हायला पाहिजे. अमली पदार्थ विक्रीचे प्रकार आढळून आल्यास त्वरीत पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे,’ असे त्यांनी सांगितले.
नंदकिशोर राठी म्हणाले, ‘गेल्या सात ते आठ वर्षांपासून व्यसनाधिनता वाढत चालली आहे. बदलती जीवनशैली, भावनिक अस्थिरता, व्यसनांचे आकर्षण, खोट्या प्रतिष्ठेमुळे व्यसनाधिनता वाढत चालली आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या मदतीने शहरातील दोन हजारजणांशी संवाद साधण्यात आला. संयम अहवाल ही केवळ आकडेवारी नसून, वास्तवावर बोट ठेवणारा आहे. या अहवालाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपायोजना करणे गरजेचे आहे’. १३ ते २२ वयोगटातील मुलांची व्यवसानिधनता या विषयावर अभ्यास करण्यात आला आहे. १३ ते १८ वयोगटातील मुले, युवक त्वरीत व्यवसनांच्या आहारी जातात, असे दिसून आले आहे. कुतूहलातून व्यसनांना सुरुवात होते. एनजी ड्रिंकच्या नावाखाली मुलांच्या आरोग्यावरप परिणाम होतो. मुलांच्या भवतालच्या वातावरणाचा परिणाम होतो. मुले समाज माध्यमात गुरफटत चालली आहेत. त्यादृष्टीने दीर्घकालीन उपायोजनांसह वेळावेळी समुपदेशन, जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे’, असे डाॅ. अनघा लवळेकर यांनी सांगितले. सुजाता दिवाण यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. सागर कवडे यांनी आभार प्रदर्शन केले.





















