Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले

पुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई 

marathinews24.com

पुणे – भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल देण्यासाठी तब्बल २ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वरिष्ठ भूवैज्ञानिक व कनिष्ठ भूवैज्ञानिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शिवाजीनगर परिसरातील वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. दिवाकर नामदेव धोटे (वय ५३, वरिष्ठ भूवैज्ञानिक) आणि प्रियंका संदीपान घुले (वय ३९, कनिष्ठ भूवैज्ञानिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

बेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी – सविस्तर बातमी 

तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी पीएमआरडीएकडे अर्ज केला होता. त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आवश्यक असल्याने त्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी आरोपी अधिकाऱ्यांनी सुरुवातीला २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दिल्यानंतर २२ एप्रिलला पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी तडजोड करून २ लाख रुपयांवर व्यवहार निश्चित केला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.२४) सापळा रचून कारवाई करत प्रियंका घुले यांना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले, तर धोटे यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 व 12 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास हडकर व पोलीस निरीक्षक खेडकर रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×