Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

पालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण

पालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घटनास्थळी पाहणी

marathinews24.com

पालघर – जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाई गावात अनधिकृत फटाका कारखान्यात मंगळवारी (दि. २१ एप्रिल)रोजी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोनसाई येथील घटनास्थळाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी स्फोटग्रस्त भागाचा आढावा घेत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यानंतर त्यांनी वाडा येथील शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची विचारपूस केली. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच त्यांना मदत देखील त्यांनी दिली. या दुर्घटनेतील पीडितांना मदत शासनस्तरावरून मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावा – सविस्तर बातमी 

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस, महसूल, कामगार अधिकारी यांच्यासोबत बैठक घेत सविस्तरपणे चर्चा केली, त्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाने अधिकृत कारखान्यांची यादी जाहीर करावी आणि तिची पडताळणी पोलीस पाटील व ग्रामसेवकांनी नियमितपणे करावी. ग्रामसेवक अनुपस्थित असल्यास ही जबाबदारी पोलीस पाटलांनी पार पाडावी. तसेच जिथे पोलीस पाटील नसतील, तिथे पोलिस निरीक्षकांनी जबाबदारी पार पाडावी. १० पेक्षा अधिक कामगार असलेल्या ठिकाणी कामगार कायदे काटेकोरपणे लागू करणे आवश्यक असून महसूल, ग्रामविकास, कामगार आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक कारखान्यात सुरक्षा उपाययोजना अनिवार्य करून ‘फायर रक्षक’ नेमण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ‘सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा’ तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच कामगारांच्या शोषणाच्या तक्रारी ग्रामविकास विभागाने नोंदवाव्यात, अशी सूचनाही संबंधित विभागाला देण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. या सर्व बाबींचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात येणार असून शासन पातळीवर याबाबत पाठपुरावा केला जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मृत कामगार भावेश वावरे यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळू नये आणि त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सक्षम सरकारी वकिलांची नेमणूक करण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस उपअधीक्षकांना दिल्या आहेत.

पालघरचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, वाडा-विक्रमगड प्रांतअधिकारी डॉ. संदीप चव्हाण, वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, पंचायत समिती गट विकास अधिकारी सुनील गवारी, कामगार विभागाचे अजित मोहिते, ग्रामसेविका वैभवी भोईर, सरपंच कैलास टोके, उपसरपंच निलेश मोकाशी, शिवसेना जिल्हा महिला संघटक वैदेही वाढान, शिवसेना तालुका संघटक रेश्मा पाटील, शिवसेना युवती सेना मनाली पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, शिवसेना तालुका प्रमुख निलेश पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, वाडा नगरसेवक अजिंक्य पाटील, उमेश लोखंड उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×