Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावा

पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावा

पुणे ग्रोथ हब आराखड्याला गती; शाश्वत विकासासाठी महत्त्वाची बैठक

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने पुणे ग्रोथ हब अंतर्गत कार्यकारी समितीची बैठक राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो भवन, शिवाजीनगर येथे संपन्न झाली. पुणे ग्रोथ हब आराखडा जिल्ह्याच्या शाश्वत व गतिमान विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास डॉ. करीर यांनी यावेळी व्यक्त केला.

शंभर टक्के फी माफीमुळे मुलींच्या तंत्रशिक्षणाला गती – सविस्तर बातमी 

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता गौतम कुमार, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अभिजीत आवटे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी श्रीमती अर्चना पठारे, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, आयएसईजीचे संचालक शिरीष संखे उपस्थित होते.

डॉ. करीर यांनी यावेळी पुणे परिसरातील आर्थिक वाढ, जीवनमानाची गुणवत्ता व शाश्वत विकास या प्रमुख तत्त्वांवर आधारित पायाभूत सुविधा, उद्योग, वाहतूक, पर्यटन, कृषी व शहरी विकास आदी विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित विभागांकडून लघुकालीन व दीर्घकालीन विकास योजना, गुंतवणूक प्रस्ताव व आवश्यक सूचनांचा अभ्यास तसेच विविध विभागांच्या समन्वयाने एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीत पुणे ग्रोथ हब या संकल्पनेअंतर्गत पुणे जिल्ह्याच्या आर्थिक व पायाभूत विकासासाठी दीर्घकालीन आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागांचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×