प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची माहिती
marathinews24.com
पुणे – वंचित घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी भाजपचा ‘पालावर दिवाळी’ उपक्रम यंदाही भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यभर ‘पालावर दिवाळी’ हा संवेदनशील आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. भाजपचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी पालांवर जाऊन दिवाळी साजरी करणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
उपक्रमाअंतर्गत भाजपचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी ऊसतोडणी कामगार, भटके-विमुक्त समुदाय, बांधकाम मजूर आणि इतर वंचित घटकांच्या पालावर जाऊन दिवाळी साजरी करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. राज्यभर भाजप कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या वस्त्यांवर जाऊन दिवाळी फराळ, मिठाई, कपडे आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात येईल.
मुलांसाठी फटाके आणि शैक्षणिक साहित्यही देण्यात येणार आहे. पालावर दिवाळी हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आणि समावेशकतेचा दीप आहे. भाजपने सण साजरा करण्याच्या माध्यमातून समाजातील दुर्बळ घटकांपर्यंत सन्मान, आपुलकी आणि आनंद पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष या उपक्रमात सक्रिय सहभागी होणार आहेत.






















