Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची दिवाळी; या अधिकाऱ्यांना पदोन्नती

शासन निर्णयामध्ये 10 अधिकाऱ्यांना पदोन्नती

marathinews24.com

पुणे – शिक्षण अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक व समक्ष पदावर सुधारित वेतन संरचनेत तात्पुरती पदोन्नती देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये 10 अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्याचा उल्लेख आहे.

बंगाली ढाक आणि ढोल ताशाच्या गजरात रंगली माता कालीची मिरवणूक – सविस्तर बातमी

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण सेवा गट-अ मधील शिक्षण अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक व समक्ष पदावर सुधारित वेतन संरचनेत तात्पुरती पदोन्नती देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये 10 अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्याचा उल्लेख आहे. मात्र, ही पदोन्नती तात्पुरती स्वरूपाची असल्यामुळे तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवड सूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवाजेष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही, असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील कैलास दातखीळ यांना छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. पुणे येथील दीपक माळी यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा राज्य मंडळ येथे सचिव पदी पदोन्नती दिली आहे. तेजराव काळे यांना शिक्षण आयुक्त कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच पुण्यातील पुष्पावती पाटील यांना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.

छत्रपती संभाजी नगर येथील सुचिता रोडगे (पाटेकर) यांना पुणे येथील माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. स्मिता गौड यांना शिक्षण आयुक्त कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली असून कोकण येथील भावना राजनोर यांना मुंबईतील शालेय शिक्षण विभागात जनसंपर्क अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. पुण्यातील प्रिया शिंदे यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत उप आयुक्त म्हणून पदोन्नती दिली आहे. तसेच प्रभावती कोळेकर यांना कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील एकनाथ अंबोकर यांना माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×