Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

महिलेचा विनयभंग करून रिक्षाचालक पसार, रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

रिक्षाचालकाने केला प्रवासी महिलेचा विनयभंग पसार झालेल्या रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा

Marathinews24.com

पुणे – रिक्षाचालकाने प्रवासी महिलेशी अश्लील कृत्य केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रिक्षाने लोहगाव परिसरातून ९ एप्रिलला दुपारी तीनच्या सुमारास घरी निघाली असताना ही घटना घडली.
लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावर रिक्षाचालकाने  इमारतीजवळ रिक्षाचा वेग कमी केला. प्रवासी महिलेशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यनंतर चालकाने घाबरुन रिक्षा थांबविली. घाबरलेली महिला रिक्षातून उतरली. रिक्षाचालक तेथून पसार झाला. महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. महिलेने रिक्षाचालकाचे वर्णन आणि वाहन पाटीवरील क्रमांक पोलिसांना दिला आहे. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस नाईक जे. के. दरवडे तपास करत आहेत.

 कंपनीतील अधिकार्‍याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

 खराडी भागातील  खासगी कंपनीतील अधिकार्‍याने सहकारी महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी खासगी कंपनीत प्रशासकीय अधिकारी असून, तक्रारदार महिला खासगी कंपनीत कर्मचारी आहे.  आरोपीने महिलेला कंपनीत सोडण्याचा बहाणा करुन मोटारीत अश्लील कृत्य केले. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रशासकीय अधिकार्‍याविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक वैशाली तागंडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×