Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ७५ लाखांची फसवणूक

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय तक्रारदार हे बिबवेवाडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठविली होती. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना एक उपयोजन (ॲप) मोबाइलमध्ये घेण्यास सांगितले. त्यामाध्यमातून त्यांना गुंतवणुकीविषयक विविध योजनांची माहिती चोरट्यांनी दिली. त्यानंतर चोरट्यांच्या आमिषाला तक्रारदार बळी पडले.

चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी ७५ लाख २० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांना परतावा दिला नाही. परताव्याबाबत तक्रारदारांनी विचारणा केली. तेव्हा चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

बाणेरमधील एकाची फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी बाणेर भागातील एकाची ११ लाख आठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सरग तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×