बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यानी केला हात साफ; सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास
Marathinews24.com
पुणे– बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरटय़ांनी महिलेच्या घरातून 1 लाख 76 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना हडपसर परिसरातील मांजरी बुद्रूकमध्ये घडली आहे. ही घटना 12 एप्रिलला सकाळी अकरा ते रात्री साडेदहाच्या सुमारास गंगानिवास दीपकनगरात घडली आहे. याप्रकरणी अश्विनी बेलोशे (वय 35 रा. गोपाळपट्टी, मांजरी, हडपसर ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
जेष्ठ महिलेला देवदर्शनाच्या रांगेत गाठले, ३० हजारांची सोनसाखळी लंपास – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अश्विनी हडपसरमधील मांजरी बुद्रूक परिसरातील गंगानिवासमध्ये राहायला आहे. 12 एप्रिलला सकाळी अकरा अश्विनी कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा पावणेदोन लाखांचा ऐवज चोरुन नेला. रात्री कामाहून आल्यानंतर अश्विनीला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने तातडीने हडपसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीस अमलदार गोसावी तपास करीत आहेत.