हांडेवाडी रस्ता, सातवनगरातील घटना
marathinews24.com
पुणे – लग्नात मानपान कमी केल्याच्या रागातून सासूने सुनेचा छळ करीत तिच्या कुटूंबियाकडून हुंड्यासाठी तगादा लावला होता. सततच्या छळाला आणि त्रासाला कंटाळून सुनेने गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना २० जूनला दुपारी बाराच्या सुमारास हांडेवाडी रस्ता, सातवनगरात घडली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी सासूविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ओढे- नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थिती; संबंधितांवर होणार कारवाई – सविस्तर बातमी
द्वारका जाधव (वय ६२) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. दीपिका प्रमोद जाधव (वय २९ रा. ड्रीम एलिगन्स सोसायटी, सातवनगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या वडिलांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची मुलगी दीपिका आणि प्रमोद यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर दीपिकाची सासू द्वारकाने जाच सुरू केला. लग्नात चांगला मानपान केला नाही, हुंडा दिला नाही म्हणून छळ सुरू केला. सतत टोमणे मारून दीपिकाचा अपमान करीत जाच केला.
सततच्या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून २० जूनला दीपिकाने राहत्या घरातील पंख्याच्या हुकाला गळफास घेउन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करीत आहेत.