Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

कोथरूडमध्ये दुचाकीस्वाराला तरुणाला धमकावून लुटले

२ लाख रूपये दे नाहीतर फोटो व्हायरल करेल

दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinres24.com

पुणे – दुचाकीस्वार तरुणाला धमकावून त्याच्याकडील ५० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना कोथरूड परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील फरारी तोतया डाॅक्टर गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दुचाकीस्वरा तरुण कोथरूडमधील भुसारी काॅलनीत राहायला आहे. १ नोव्हेंबर रोजी तक्रारदार तरुण दुचाकीवरुन सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोथरूड पीएमपी स्थानक परिसरातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी दुचाकीस्वार तरुणाला अडवले आणि त्याच्याशी कारण नसताना वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर चोरट्यांनी झटापट करुन तरुणाच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. सोनसाखळी हिसकावून नेल्यानंतर तरुणाने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले.

घटनेमुळे तरुणाला मानसिक धक्का बसला होता. त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार एच. एन. माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×