Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुस्तकांवरील जीएसटी कमी करा…

राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन

marathinews24.com

पुणे – पुस्तक व कागदावर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर (GST) दर कमी करण्याची मागणी प्रकाशन आणि शैक्षणिक क्षेत्राकडून जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार तथा केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याबाबत औपचारिक पत्र पाठविण्यात आले आहे.

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५; काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी… सविस्तर बातमी

मोहोळ म्हणाले, “कागद आणि संबंधित साहित्यावरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे पुस्तकांच्या किंमतींमध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीचा परिणाम थेट विद्यार्थी, पालक, लेखक, तसेच लघु आणि मध्यम प्रकाशन उद्योगांवर होत आहे. कोविडनंतर अजूनही सावरण्याच्या टप्प्यात असलेला प्रकाशन व्यवसाय या वाढलेल्या करामुळे पुन्हा संकटात सापडू शकतो, त्यामुळे जीएसटी वाढीचा पुनर्विचार करावा अशी विनंती करत आहे.”

पत्रात पुढे म्हटले आहे की, “पुस्तके ही केवळ वस्तू नसून ती ज्ञान, शिक्षण आणि संस्कृतीचा पाया आहेत. अशा परिस्थितीत पुस्तकांवरील जीएसटी दर कमी करून पुन्हा १२ टक्क्यांवर आणावेत किंवा शैक्षणिक वापरासाठी असलेल्या कागद व पुस्तकांना करातून पूर्णतः सूट द्यावी.”

जीएसटी दर कमी केल्यास प्रकाशन व मुद्रण उद्योगाला पुनरुज्जीवन मिळेल, पुस्तके व शैक्षणिक साहित्य सर्वांसाठी परवडणारे राहतील आणि “विकसित भारत” या ज्ञानाधिष्ठित ध्येयाला चालना मिळेल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिक्षण आणि प्रकाशन क्षेत्र ही ज्ञानाधारित समाजाची दोन महत्त्वाची स्तंभ आहेत. या क्षेत्रावर वाढत्या कराचा बोजा नको, अशी विनंती मोहोळ यांनी पत्रात केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×