नवले पूल परिसरात वेगमर्यादा ३० किमी प्रतितास

आठवड्याभरात होणार अंमलबजावणी

marathinews24.com

पुणे – शहरातील नवले पूल अपघात रोखण्यासाठी विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने विविध यंत्रणांवरची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वाहतूक विषयक सुधारणा, वेगमर्यादा, तसेच सेवा रस्त्यांच्या कामातील भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून महिनाभरात अहवाल सादर करण्याच्या सूचना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नुकत्याच दिल्या आहेत.

तब्बल ३७८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी – सविस्तर बातमी

स्वामी नारायण मंदिर ते नवले पूलदरम्यान तीव्र उतार असल्याने जड वाहनांसाठी वेगमर्यादा ६० वरून ३० किमी प्रतितास केली आहे. येत्या आठड्याभरात या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती वाहतुक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. वेगमर्यादा ६० वरून ३० किमी प्रतितास करण्याचा निर्णय झाल्यानंतर, एनएचएआय कडून या रस्त्यावर स्ट्रीप्स, रम्बलर्स टाकण्यास सुरूवात करण्यात आली आहे. यानंतर एनएचएआय कडून वेगमर्यादेचे बोर्ड लावले जातील. त्यानंतर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून नोटिफिकेशन काढण्यात येईल, त्यानंतर गरजेनुसार स्पीड गन्स बसवून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरूवात केली जाईल.

प्रक्रियेसाठी साधारण एक आठवड्याचा कालावधी लागणार असून, २४ नोव्हेंबर पासून नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू होऊ शकते. पुणे पोलिस तसेच एनएचएआय कडून शनिवारी झालेल्या बैठकीनंतर तत्काळ नवले पूल परिसरातील प्रश्न मार्गी लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे. याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात जागेवरच कारवाई करण्यात येणार असून, लवकरच पुणे-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका येथे ट्रक आणि कंटेनर चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. जड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल आढळल्यास तो जागेवरच उतरवण्यात येणार असल्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×