जिथे केला त्याने हल्ला, पोलिसांनी तिथेच काढली धिंड
Marathinews24.com
पुणे – पुण्यातील सिंहगड कॉलेज परीसरात कोयत्याने हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तन्मय सखाराम भुयारी ( वय २० रा. सध्या सिंहगड कॅम्पस, वडगाव, पुणे मुळ रा. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
१२३ तक्रारींवर महिला आयोगाची कारवाई; रूपाली चाकणकर – सविस्तर बातमी
चंद्रागण कॅपिटल मुख्य इमारतीच्या गेटजवळ ८ एप्रिलला सकाळी सहाच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबलेल्या तरुणावर आरोपी तन्मय भुयारी व ज्ञानेश्वर जाधव यांनी वार केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी तन्मयला १२ एप्रिलला अटक केली आहे.
आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे सिंहगड कॉलेजमधील विद्यार्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सिंहगड कॉलेजमधील शिक्षण घेणारे विद्यार्थीच्या दहशती पासुन भयमुक्त होण्यासाठी आरोपीची सिंहगड कॉलेज आवारामध्ये धिंड काढण्यात आली.