पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून डाॅक्टरांची ४६ लाखांची फसवणूक

बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरूणीला १२ लाख १५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २८ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ कालावधीत टिंगरेनगरात घडली आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार टेलीग्राम आयडी धारकासह बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर ट्रेडींगमध्ये गुंंतवणूकीचे आमिष; २७ लाख ४१ हजारांची झाली फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला टिंगरेनगरात राहायला असून, २८ ऑक्टोबरला सायबर चोरट्याने त्यांना टेलीग्राम आयडीवरून ग्रुपमध्ये अ‍ॅड केले. त्यांना पार्टटाईम जॉब देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादित केला. त्यांना सायबर चोरट्याने महिलेला टास्क देउन ते पुर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले. त्यासाठी काही रक्कम ऑनलाईनरित्या पाठवावी लागेल, असे सांगून रक्कम ऑनलाईनरित्या बँकखात्यात वर्ग करून घेण्यास सुरूवात केली. अवघ्या काही दिवसात १२ लाख १५ हजार रूपये वर्ग करून घेत महिलेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×