Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

शेअर ट्रेडींगमध्ये गुंंतवणूकीचे आमिष दाखवून केली फसवणूक 

जेष्ठाला ट्रेडींगमध्ये गुुंतवणूकीचे आमिष पडले ३३ लाखांना

२७ लाख ४१ हजारांची झाली फसवणूक

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने एकाला तब्बल २७ लाख ४१ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १० ऑगस्ट ते ३ नोव्हेंबर २०२५ कालावधीत खडकीतील रेंजहिल्स परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखाते धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूड, बाणेरमध्ये घरफोडी; ४ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खडकीतील रेंजहिल्स परिसरात राहायला असून, १० ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरूवात केली. तब्बल २७ लाख ४१ हजार रूपयांची गुंतवणूक करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंग कदम तपास करीत आहेत.

जादा परताव्याला भुलू नका

नागरिकांनो जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरटे अनेकांना जाळ्यात अडकवत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कोणत्याही आमिषाला बळी न पडता जादा परताव्याचे आमिष टाळावे, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे. अशा पद्धतीने जाळे टाकणार्‍याविरूद्ध कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करावी, असेही पोलिसांनी आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×