Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

कोथरूड, बाणेरमध्ये घरफोडी; ४ लाखांचा ऐवज चोरीला

हडपसरमधील सराफी पेढीतून ९८ लाखाांचे दागिने चोरी

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्चाद मांडला आहे. कोथरूड, बाणेर, तसेच हडपसरमधील फुरसुंगी भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ४ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. कोथरूडमधील उजवी भुसारी काॅलनीत असलेल्या सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अल्पवयीनाकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त – सविस्तर बातमी

तक्रारदार महिलेचे आतेबहीण भुसारी काॅलनीतील अमोलिका सोसायटीत राहायला आहेत. त्या बाहेरगावी गेल्या आहेत. चोरट्यांनी गुरुवारी (२७ नाेव्हेंबर) पहाटे सदनिकेचे कूलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा२ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर रहिवाशांनी याबाबतची माहिती महिलेला दिली. याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख तपास करत आहेत.

बाणेर भागात एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर असलेल्या बेसल गार्डन सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील ६५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना मध्यरात्री घडली. सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करत आहेत. हडपसरमधील फुरसुंगी परिसरात एका घरातून चोरट्यांनी एक लाख ६७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे होळकरवाडी परिसरात राहायला आहेत. त्यांचे बैठे घर आहे. तक्रारदार हे सहकुटुंब विवाह समारंभानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराच्या छतावरून प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ६७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पाेलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

कोथरूडमध्ये मद्य विक्री दुकानातून रोकड चोरी

कोथरूड भागात एका देशी मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील पाच हजार रुपयांची रोकड लांबविल्याचे उघडकीस आला. याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार हे भवानी पेठे राहायला आहेत. त्यांचे कोथरूडमधील आशिष गार्डन चौकात देशी मद्य विक्रीचे दुकान आहे. २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उतकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील पाच हजार रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक एस. टी. गावित तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×