अल्पवयीनाकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

कात्रज भागात कारवाई

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीनाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. कात्रजमधील जांभुळवाडी रस्ता परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी एका अल्पवयीनाकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी उज्जल मोकाशी आणि योगेश मांढरे यांना मिळाले.

इमारतीवरून उडी मारत महिलेची आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी सापळा लावून अल्पवयीनाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. अल्पवयीनाने पिस्तूल का बाळगले, तसेच त्याने पिस्तूल कोणाकडून घेतले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, संजय जाधव, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, शंकर कुंभार, नागनाथ राख, सद्दाम तांबोळी, आजीम शेख, विशाल दळवी यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×