राष्ट्रीय शालेय जलतरण डायविंग क्रीडा स्पर्धा २०२५-२६ साठी महाराष्ट्र संघ रवाना

राष्ट्रीय शालेय जलतरण डायविंग क्रीडा स्पर्धा २०२५-२६ साठी महाराष्ट्र संघ रवाना

महाराष्ट्र राज्यातील १४, १७ व १९ वर्षाखालील मुलांचा संघ दिल्लीकडे रवाना

marathinews24.com

पुणे – ६९ वी राष्ट्रीय शालेय जलतरण डायविंग क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ चे आयोजन २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ या कालावधीत त्यागराज स्टेडियम, दिल्ली येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील १४, १७ व १९ वर्षाखालील मुलांचा संघ २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून दिल्लीकडे रवाना झाला.

दीड वर्षाच्या नील भालेवरची कमाल; ४५ कार ब्रँडची ओळख देत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद – सविस्तर बातमी 

संघाच्या दिल्लीकडे रवाना होताना पुणे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी योगेश खोब्रागडे, दादासाहेब देवकते, क्रीडा मार्गदर्शक बालाजी केंद्रे, नीलकंठ आखाडे तसेच संघ व्यवस्थापक तलवाडे, म्हेत्रे, भालेराव, कुरपे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य संघ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास संचालनालयाने व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×