उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोगममध्ये देशमुख कुटुंबियाशी संवाद साधला
marathinews24.com
बीड : अनंत जाधव – मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणाला दि.२९ नोव्हेंबर शनिवार रोजी तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले आहे. अद्यापही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. तो आरोपी पोलिसांना सापडत नाही, याचे दुर्दैव आहे.
शिक्षण हेच परिवर्तनाचे मोठे साधन- डॉ. गजानन एकबोटे – सविस्तर बातमी
संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाती धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी मी तुमच्यासोबत मुख्यमंत्र्यांकडे येतो. पक्षाचे लोक खून जरी झाले तरी मतासाठी सांभाळतात. तुम्हाला दुःख ते सहा कोटी मराठ्यांना दुःख आहे. धनंजय मुंडे याला सह आरोपी करावे, चौकशी करावी. एक जरी आरोपी सुटला तरी तुमचे काही खरे नाही . सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजेत. मग न्याय मिळाला असे कुटुंबाला वाटेल. आपण कोड्यात बोललो तर लोक संभ्रमात राहतात धमकीचे फोन येत असतील तर आम्हाला सांगा, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सांगितले.
सरपंच संतोष देशमुख यांची दि.९ डिसेंबर२०२४ रोजी काही गुंड प्रवृत्ती लोकांनी हत्या केली होती. घटनेला एक वर्ष उलटले आहे. देशमुख यांचे मस्साजोग येथे प्रथम पुण्यस्मरण ह.भ. प समाधान महाराज शर्मा यांच्या अमूल्य वाणी किर्तन महोत्सवाने पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, डॉ अशोक थोरात,आमदार प्रकाश सोळंके , मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे , करूणा मुंडे, दीपक केदार, समाजसेवक महावीर सोनवणे, शिवसेना पदाधिकारी सचिन मुळूक, स्वप्निल गलधर, अनिल जगताप, पंजाबराव देशमुख यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, संस्कार हीन लोकांशी तसेच वागावे लागणार आहे. अंहिसेशी तसेच वागावे लागणार आहे. वठणीवर आणण्यासाठी नाठाळाच्या माथी हाणू काठी. मुंडेला किती ताकद लावायची ती लावू द्या. आमच्या लेकरांचा खून त्यांनीच केला. तुम्ही त्या खून करण्याचे समर्थन करता, म्हणजे तुम्ही खुनी आहेत. जर दोन दिवस पोरग पोरगी दिसली नाही तर झोप येणार नाही. कुठल्याही मराठ्यांवर अन्याय झाला तरी राज्यातील मराठा समाजाने एकत्र यायला हवे. असे वक्तव्य केले.
आमदार सुरेश धस म्हणाले, सभागृहात मी १६ डिसेंबरला बोललो होतो.आता त्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केल्या आहेत. तेली साहेब, गुजर साहेब, विशेष सरकारी वकील यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने बाजू मांडली. निकम यांची खासदार म्हणून निवड झाल्यानंतर अनेकांनी सुस्कारा सोडला.. पण निकम हे केस लढत आहेत. यामध्ये तीन तीन कलम लागल्याने या लोकांची सुटका होणार नाही.या लोकांना फाशी व्हायला हवी. चार्ज फ्रेम करणे हे कोर्टाच्या हातात असते. येथून पुढची लढाई आहे ती लढणार आहोत.ते शंभर शंभर वकील आणत आहेत. ज्यांच्या आदेशावर हा खून झाला, त्यांची आठवण स्वार्थासाठी येत आहे. कृष्णा आंधळे जो आहे तो सापडलेला नाही. त्याच्या घराचे काही घेणे देणे नाही. तो फरार असला तरी केसवर काही परिणाम होणार नाही. जेल मधून काही लोक धनंजय मुंडे यांना फोन करत असतील. असीम सरोदे यांना मी ओळखत नाही. माझा आणि त्याचा काही संबंध नाही.
खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, घटनेला एक वर्ष पूर्ण झाला यावर विश्वास बसत नाही. मी धनंजयला सांगितलं की आपण सावरलं पाहिजे. धनंजयने आत्तापर्यंत अन्नाचा कण घेतला नाही. इतिहासामध्ये घडली नाही अशी क्रूर हत्या ही घडली आहे. फाशीची शिक्षा भेटल्याशिवाय आम्हाला समाधान लाभणार नाही. माणूस गेला आहे समाधान या प्रकरणात विषय नाही. या प्रकरणात सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. तळहाताच्या फोडाप्रमाणे सरपंचाला गावकरी सांभाळत होते ते बिनविरोध सरपंच असल्यासारखे होते .
या प्रकरणात जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाचा तपास पूर्ण केला पाहिजे. तपासाला कॅप टाकली आहे ती कॅप काढा आणि तपास पुढे करा. धनंजय मुंडे यांना सहा आरोपी करा हे प्रश्न विचारण्याची का वेळ का यावी जे सत्य आहे ते झालं पाहिजे . प्रकरणाचा तपास थांबवला आहे हा तपास कोणी थांबवला आहे हा तपास पुढे गेला पाहिजे. मी आज आरोप करणार नाही गृह खात्याने थांबवला की कोणी थांबवला हे बघितले पाहिजे .
धस सत्तेच्या बाजूने आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडली त्यांची समाधान झाले असेल पण मी समाधानी नाही. मोकळ्या वातावरणात तपास करा शेवटच्या टोकापर्यंत या प्रकरणात ज्यांनी आरोपींना पळून जायला साथ दिली त्यांना काय केलं साधी नोटीस तरी दिली का मनोज जरंगे काय बोलले हे ऐकलं पाहिजे मी ते ऐकल्यानंतर याच्यावर प्रतिक्रिया देतो. ते काय म्हणले आहे ते मला बघू द्या.या प्रकरणात अजितदादा धनंजय मुंडे यांच्या सोबत आहेत का मुख्यमंत्री आहेत हे बघितलं पाहिजे. लोकांच्या समस्या असल्यास की टोळीच्या समस्या असल्यास फोन येतो हे बघितलं पाहिजे. लोकांनी किती प्रेम केलं आहे हे नगरपालिका निवडणुकीत कळेल असं मत खासदार सोनवणे यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ताफा मस्साजोगच्या दिशेनी वळवला
उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बीडच्या दौऱ्यावर होते. माजलगाव आणि धारुर येथे त्यांच्या नियोजित सभा होत्या. या सभा आटोपल्यानंतर अजित पवारांचा ताफा हेलिपॅडकडे रवाना होणं अपेक्षित होतं, कारण पुढे ते बीडला जाणार होते. मात्र अचानक त्यांच्या गाड्या मस्साजोगच्या दिशेने वळवल्या या. अचानक झालेल्या या बदलामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. मस्साजोग येथे येत स्व.संतोष देशमुख यांच्या पुण्यस्मरण निमित्त अभिवादन केले आणि धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांच्याशी संवाद साधला.























