कोयत्याने हल्ला करुन दहशत पसरविणारा अटकेत भारती  पोलिसांची कामगिरी…

पोलिसांनी काढली कॉलेज परिसरात धिंड

Marathinews24.com

पुणे – कॉलेजमध्ये दहशत पसरवित तरूणावर  हत्याराने वार करुन जखमी करणार्‍या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ज्या कॉलेजच्या परिसरात त्याने दहशत माजविली होती. त्याच सिंहगड कॉलेज परिसरात पोलिसांनी त्याची धिंड काढली. तन्मय सखाराम भुसारी (वय २०, रा. सिंहगड कॅम्पस, वडगाव, मुळ रा. बुलढाणा) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.  रिहान महंमद होडगी (वय १८, रा. आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

रिहान हा पूर्वी सिंहगड लॉ कॉलेजसमोरील समर्थ चहाच्या टपरीवर काम करत होता. ८ एप्रिलला पहाटे साडेपाच वाजता तो रिक्षा घेऊन निघाला होता. चहा पिण्यासाठी तो समर्थ चहाची टपरीवर गेला होता. त्याच्या तोंड ओळखीचे तन्मय व ज्ञानेश्वर हे दोघांबरोबर भांडणे करत होते. तेव्हा त्याने तन्मयला कशाला भांडणे करता, असे विचारले. त्यावर तन्मयने तु मला मारणार का, असे म्हणून धारदार हत्याराने रिहानवर वार करुन गंभीर जखमी केले होते. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तन्मय भुयारी याला १२ एप्रिलला अटक केली.

स्पोर्ट बाईकवरून मेफेड्रॉन विक्रीसाठी आला अन  जाळ्यात सापडला – सविस्तर बातमी 

ही कामगिरी अपर  आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी,

जिथे दहशत माजविली, तिथेच धिंड काढली

सिंहगड कॉलेजमध्ये रिहानवर हत्याराने वार करुन तन्मयने दहशत पसरविल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. कॉलेज आवारामध्ये विद्यार्थ्यांना त्रास देणार्‍या टवाळखोरांची मस्ती उतरविण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीची धिंड काढली. त्याठिकाणी त्याने दहशत माजविली होती. त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याला चालवित नेले. त्याला समर्थ चहाची टपरी परिसरात   फिरविण्यात आले. त्याठिकाणावरील नागरिकांसह  विद्यार्थ्यांना भयमुक्त केले.

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत दादागिरी करणार्‍यांविरूद्ध आम्ही वेळोवेळी कठोर कारवाई करीत आहे. बेकायदा वर्तन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शालेय परिसरासह कोणत्याही ठिकाणी मस्ती खपवून घेतली जाणार नाही. – सावळाराम साळगांवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×