Breking News
कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिकारांजणगाव तिहेरी खूनाच्या तपास फास्ट ट्रॅकवरउद्योगांनी सामाजिक भावनेतून समाजाच्या कल्याणासाठी मदत करावी- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारनवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबचत गटातील महिलांमार्फत घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वाटपलोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात !चार कोटी खर्च केलेल्या ऍथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापरचऱ्होलीकर सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढणारआषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यलायात समन्वय बैठकस्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांचे पाच महिन्यापासून कमिशन रखडले

घर खाली करण्यासाठी दबाब, टोळक्याविरूद्ध गुन्हा

घर रिकाम करण्यासाठी धमकी, गुन्हेगारी टोळीवर केस

Marathinews24.com

पुणे – कोर्टाचा निकाल आमच्या बाजुने लागला आहे म्हणत, घर खाली करण्यासाठी दबाब टाकून धक्काबुक्कीसह मारहाण करणार्‍या १०  ते ११ जणांच्या टोळक्यावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रकरणाची न्यायालयात सुनावणीची  पुढील तारीख १६ जून असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

कोयत्याने हल्ला करून दहशत पसरवणारा अटकेत – सविस्तर बातमी

प्रविण मोगरे, सौरेश मोगरे, दिपक मोरगरे, राकेश मोगरे, प्रदिप मोगरे, अर्चना प्रविण यांच्यासह इतर तीन ते चार जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अनिता भैय्यालाल अहीर (५४, रा. सोलापूर बाजार कॅम्प, पुणे) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आहिर आणि त्यांचे कुटूंबिय  दि. १५ एप्रिलला कॅम्पमधील घर क्रमांक ६९ येथे उपस्थित होते. त्यावेळी आरोपींनी कोर्टाचा निकाल आमच्या बाजुने लागला म्हणत घर खाली करण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर तक्रारदाराने घरातील सगळ्यांनी बाहेर काढून घराला कुलुप लावले. त्यावेळी आरोपीनी घराचे कुलुप तोडत असताना फिर्यादीनी त्याला विरोध केला. त्यावेळी तक्रारदाराला धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top