स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्कार प्रकरण
Marathinews24.com
पुणे – स्वारगेट बसस्थानकातून गावी निघालेल्या तरूणीला चुकीच्या बसची माहिती देउन तिला निमर्नुष्य ठिकाच्या बसमध्ये नेउन बलात्कार करणाNया आरोपीविरूद्ध पुणे पोलिसांनी शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दत्तात्रय गाडे असे त्याचे नाव असून, त्याच्याविरूद्ध पोलिसांनी ८९३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
स्वारगेट एसटी स्थानकातून गावी चाललेल्या २७ वर्षीय तरूणीवर नराधम दत्तात्रय गाडे याने २५ पेâब्रुवारीला सकाळी सहाच्या सुमारास बसमध्येच बलात्कार केला होता. आरोपी गाडेने तरूणीला वाहक असल्याची बतावणी करून शिवशाही बसमध्ये नेले. दरवाजा लावून त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन दोनदा बलात्कार केला. घटनेचे राज्यात पडसाद उमटले होते. स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध शिवाजनगर येथील सत्र न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल केले.
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ५२ दिवसांत हा तपास पुर्ण केला आहे. विविध पातळ्यांवर तपास करीत आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी गणेश इंगळे, एसीपी राहूल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे, एपीआय राजेश माळेगावे, उपनिरीक्षक अस्मिता लाड, उपनिरीक्षक पूनम पाटील यांनी प्रकरणाचा तपास केला.