Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज-पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल

पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज-पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल

१६२४ अमलदार, ११८७ होमगार्ड तैनात; महिलांसह वारकर्‍यांची घेतली जाणार काळजी

marathinews24.com

पुणे – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले आहे. त्याअनुषंगाने तब्बल पावणेदोन हजारांवर कर्मचारी-अधिकार्‍यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. महिलांसह वारकर्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेतली आहे. त्यासोबतच क्यूआरटी, बॉम्बशोधक व नाशक पथक, एसआरपीएफ दलाच्या तुकड्याही तैनात केल्या आहेत. वाहतूकीच्या अनुषंगाने बदल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपस्थित होते.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालखी मार्गावरील फलकधारकांना महापालिकेने दिल्या सूचना – सविस्तर बातमी 

पोलीस अधीक्षक गिल्ल म्हणाले, जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे २२ जूनला पुणे जिल्ह्यातील नायगांव फाटा ( उरुळीकांचन पोलीस ठाणे ) हद्दीत प्रवेश होणार आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे २३ जूनला आगमन झेंडेवाडी (सासवड पोलीस ठाणे) हद्दीत होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दोन्ही पालखी सोहळयाच्या मार्गावर अवजड वाहनांचा अडथळा होउ नये, यासाठी १२ ठिकाणी विशेष पोलीस अधिकारी व वाहतूक अमंलदारांची नियुक्ती केली आहे. अनावश्यक वाहने येउ नये, यादृष्टीनेही व्यवस्थापन केले आहे. तसेच दोन्ही पालखी सोहळयात प्रत्येकी १५ अमंलदार हे साध्या वेशात कार्यरत राहणार आहेत. महिला सुरक्षितता, चैनस्नॅचिंग विरोधी पथक रोखण्यासाठी प्राधान्य दिले आहे.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चोरीच्या घटना घडू नये, यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्याअधिपत्याखाली विशेष पथक तैनात केले आहे. तसेच दोन्ही पालखी वारीमध्ये सहभागी होणार्‍या महिला वारकर्‍यांच्या सुरक्षिततेत्या दृष्टीने हरितवारी मार्गावर शक्ती अभियान अंतर्गत महिलांची दोन पथके दक्ष राहणार आहेत. रथामधील माऊलींचे दर्शन घेताना पुरुष व महिला भाविकांची गर्दी होते. अशावेळी चैन स्नॅचिंगची घटना घडू नये, यासाठी वारीमध्ये सहभागी होणार्‍या वारकर्‍यासह नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.तसेच आरोग्य पथकाच्या मदतीसाठी दोन पोलीस पथके तयार ठेवली आहे. दरम्यान, पालखी मार्गावर मद्यविक्री व मांसविक्री होणार नाही यासाठी दक्षता घेतली आहे.

निर्मलवारी अन हरितवारी पथक

पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर त्या मार्गावरील साफसफाई करण्यासाठी जिल्हा परिषद, पुणे याच्याकडून निर्मलवारी अंतर्गत साफसफाई केली जाणार आहे. तसेच हरितवारी अंतर्गत जनजागृती, वृक्षलागवडीबाबत महत्व पटवून दिले जाणार आहे. पालखी सोहळा दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पालखी सोहळा विश्वस्त व पोलीस दल यांच्या विद्यमानाने प्रत्येक विसावा आणि मुक्कामाचे ठिकाणी वृक्षारोपन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पोलीसांचा सहभाग असणार आहे. दरम्यान, पालखी विश्वस्थ व पालखी व्यवस्थेत सहभागी सदस्याच्या वाहनांसाठी पासेस दिले आहेत.

पोलीस सर्वेलन्स व्हॅन राखणाार नजर

पालखी मार्गावर महीलांसह इतरांच्या सुरक्षिततेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. पोलीस सर्वेलन्स व्हॅनद्वारे सीसीटीव्ही वॉच ठेवला जाणार आहे. पोलीस पथकासह अध्यावत व्हॅन तैनात केल्या आहेत. पोलीस अंमलदार १ हजार ६२४, पोलीस अधिकारी १८३, होमगार्ड १ हजार १८७, एसआरपीएफ दोन कंपन्या, आरसीपीपथक, क्यूआरी प्रत्येकी दोन पथक तैनात केले आहेत. पोलीस अधिक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर अधीक्षक रमेश चोपडे, अपर अधीक्षक गणेश बिरादार बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्यातील बंदोबस्त तैनात केला आहे.

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून जय्यत तयारी केली आहे. वारकर्‍यांसह महिलांच्या सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेतली आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त, वाहतूक डायव्हर्जन, वेगवेगळ्या पथकांचा पोलीस बंदोबस्त सोहळ्यात बारकाईने लक्ष ठेवणार आहे. – संदीपिंसह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×