Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे आईलाच केली बेदम मारहाण

खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे आईलाच केली बेदम मारहाण

सव्वा पाच लाखांचा ऐवज चोरून नेणार्‍या मुलाला अटक

marathinews24.com

पुणे – खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे आईला लोखंडी रॉडने मारहाण करीत गंभीर जखमी करणार्‍या मुलाला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याने महिलेकडील सोन्या-चांदीचा ऐवज आणि मोबाइल असा ५ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना १७ जूनला दुपारी दोनच्या सुमारास कसबा पेठेतील अग्रवाल तालीम किनारा हाउसिंग सोसायटीत घडली. शंभो राजू सूर्यवंशी (वय २९ रा. कसबा पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लक्ष्मी राजू सूर्यवंशी (वय ५४ रा. कसबा पेठ) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रियंका भरत सूर्यवंशी (वय २५) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज-पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्यवंशी कुटूंबिय कसबा पेठेतील अग्रवाल तालीम किनारा हाउसिंग सोसायटीत राहायला आहे. १७ जूनला लक्ष्मी घरी असताना त्यांचा मुलगा शंभोने खर्चासाठी पैसे मागितले. मात्र, लक्ष्मीने त्याला पैसे न दिल्यामुळे चिडलेल्या शंभोने लोखंडी रॉडने त्यांना बेदम मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देउन त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल असा ५ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, फरासखाना पोलिसांनी आरोपी शंभो सूर्यवंशी याला ताब्यात घेत अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चौगले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×