Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

महिलेच्या छेडछाडीवरून तरूणाचा खून

Pune Crime News

बोपखेल येथील गणेशनगरमधील घटना 

marathinews24.com

पिंपरी : नातेवाईक महिलेची वारंवार छेडछाड करत असल्याच्या कारणावरून तिघांनी तरूणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून खून केला. ही घटना बोपखेल येथील गणेशनगरमध्ये सोमवारी सायंकाळी सव्वापाच ते साडेसहाच्या दरम्यान घडली.

सहा वर्षांच्या मुलासह महिलेची इमारतीतून उडी मारून आत्महत्या – सविस्तर बातमी 

याप्रकरणी दोन जणांना दिघी पोलीसांनी अटक केली असून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. विकास राजेश खरे (वय २४, बोपखेल) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. रोहन अरुण गायकवाड (वय २१), माम्या उर्फ प्रतीक दौलत मोहोड (वय २७, दोघे रा. बोपखेल) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या १५ वर्षीय साथीदाराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. निरज राजेश खरे (वय २७) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी रोहन गायकवाड याच्या नातेवाईक महिलेची मयत विकास हा वारंवार छेडछाड करत असे. याचा रोहनला राग होता. सोमवारी सायंकाळी गणेशनगर गल्ली क्रमांक १३ येथील लष्कराच्या सिमाभिंतीलगत आरोपी आणि मयत विकास हे दारू पित बसले होते. यावेळी झालेल्या वादात आरोपींनी विकासच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने विकास याचा मृत्यु झाला. दिघी पोलीसांनी तात्काळ तपास करीत तिनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×