Breking News
कोथरूडमध्ये ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीकडून बंदबीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेशहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाडराज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्तमातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

भंडारा डोंगर पायथ्याला ‘कॉरिडॉर’ विकसित करणार

भंडारा डोंगर पायथ्याला ‘कॉरिडॉर’ विकसित करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

marathinews24.com

पिंपरी – श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याशी असलेली सव्वाशे एकर गायरान जमीन ताब्यात घेऊन वारकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारतर्फे येथे कॉरिडॉर विकसित केला जाईल. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून याकामी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

मोदी सरकारने ११ वर्षांच्या कार्यकाळात विकसित भारताचा पाया रचला – रविंद्र चव्हाण – सविस्तर बातमी 

श्री क्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होण्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सदिच्छा भेट दिली. श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील यांनी ट्रस्टच्या वतीने पवार यांचे स्वागत केले. तुकोबांची पगडी घालून सत्कार करण्यात आला.

संत तुकोबारायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पवार यांनी दर्शन घेतले. मावळचे आमदार सुनील शेळके, माउली महाराज कदम, ट्रस्टचे विश्वस्त रामभाऊ कराळे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रकाश सोमवंशी, प्रशांत भागवत यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

भंडारा डोंगरावर दीड तास थांबून उपमुख्यमंत्री पवार यांनी मंदिर बांधकामाची सखोल पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. नियोजित मंदिर परिसराचे नियोजन, रचना, श्रद्धास्थळ म्हणून वारकरी, भाविकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा आणि भावी पिढ्यांसाठी संत साहित्य व आध्यात्मिक वारसा जपण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. संत तुकाराम महाराजांचे कार्य, विचार आणि वारसा अखंडपणे टिकवणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगतानाच मंदिराची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना पवार यांनी संबंधितांना दिल्या.

पवार म्हणाले, ‘‘कुठल्याही शासकीय मदतीशिवाय वारकरी आणि सर्वसामान्यांच्या योगदानातून श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर उभारले जात असलेले अप्रतिम आणि दिव्य मंदिर हजारो वर्ष टिकू शकेल. अयोध्येतील श्री राम मंदिरानंतर वारकरी संप्रदायाचे हे आकर्षक असणार आहे. संत तुकाराम महाराजांचे चरित्र हे भक्ती, वैराग्य आणि सामाजिक समतेचा मूर्तिमंत आदर्श असून, तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र ठरणार आहे. मंदिर बांधकामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचा शब्द पवार यांनी विश्वस्त समितीला दिला. ट्रस्टचे अध्यक्ष काशीद यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती पवार यांना दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top