Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

फ्लॅटमधून ७ लाखांचा ऐवज लांबविला, वाघोलीतील घटना

फ्लॅटमधून ७ लाखांचा ऐवज लांबविला, वाघोलीतील घटना

वाघोली भागातील घटना 

marathinews24.com

पुणे – फ्लॅटमधून तब्बल ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना वाघोली भागात घडली. फ्लॅटच्या दरवाज्यावर ठेवलेली चावी घेऊन चोरट्याने कुलूप उघडून चोरी केली आहे. त्यामुळे चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वाघोलीतील काळूबाईनगर परिसरात असलेल्या अश्विनी रेसीडन्सी सोसायटीत राहायला आहेत. त्या १७ जून रोजी दुपारी फ्लॅट बंद करुन कामानिमित्त घरातून बाहेर पडल्या होत्या.

महिलेच्या छेडछाडीवरून तरूणाचा खून -सविस्तर बातमी 

फ्लॅटची चावी दरवाज्याजवळ ठेवली होती. चावी ठेवलेली जागेची माहिती महिलेच्या कुटुंबीयाना असते. त्यामुळे महिला नेहमी दरवाज्याजवळ असलेल्या जागेत चावी ठेवायची. चोरट्याने दरवाज्याजवळ ठेवलेली चावी घेऊन फ्लॅटचे कुलूप उघडले. कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटा पसार झाला. महिला सायंकाळी घरी आली. तेव्हा ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक बागल तपास करत आहेत.

फ्लॅटजवळच ठेवलेली चावी ठरतेय कारणीभूत

बहुतांश कुटूंबियाकडून फ्लॅटची चावी दरवाज्याजवळील कुंडीत, सापटीत, तसेच पादत्राणे ठेवण्याच्या रॅकमध्ये ठेवली जाते. ठेवलेल्या चावीची जागी कुटुंबीयांना माहित असते. दरम्यान, चोरट्यांकडून आता अशा फ्लॅटची रेकी करून चावी शोधून ऐवज लांबविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. कोथरूड आणि मार्वेâटयार्ड भागात गेल्या वर्ष फ्लॅटजवळ ठेवलेली चावी चोरन चोरट्यांनी ऐवज चोरुन नेला होता.

कोंढव्यात घरफोडी, २ लाखांचे ऐवज चोरीला

फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोंढवा परिसरातील इशा पर्ल सोसायटीतर राहायला आहेत. त्या १६ जून रोजी सायंकाळी बाहेर पडल्या होत्या. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातून २ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

चंदननगर परिसरात मंदिरातील दानपेटी फोडली

मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी १६ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना चंदननगर भागात घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुखदेव विट्ठल साकोरे (वय ६३, रा. शिवशक्ती चौक, गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव शेरीतील जुन्या मुंढवा रस्त्यावर संत श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आहे. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. मंदिरातील दानपेटीचे कुलूप उचकटून १६ हजारांची रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×