Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

सिगारेट ओढण्यास हटकले, तरूणाचा केला खून

सिगारेट ओढण्यास हटकले, तरूणाचा केला खून

पानशेतमधील घटना, २४ तासांत पाचही आरोपींना अटक

marathinews24.com

पुणे – पर्यटनासाठी गेलेल्या तरूणांना सिगारेट ओढण्यास मज्जाव केल्याच्या रागातून टोळक्याने स्थानिक तरूणाला बेदम मारहाण करीत त्याच्या छातीत दगड मारून खून केला. ही घटना १५ जूनला पानशेतमधील हॉटेलसमोर घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेसह वेल्हा पोलिसांनी पाचही आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपस्थित होते.

शेअर ट्रेडींगचा परतावा पडला १८ लाखांना – सविस्तर बातमी 

रोहीदास काळुराम काटकर (वय २४ रा. कादवे ता वेल्हे जि पुणे ) असे खून केलेल्या तरूणाचे नाव आहे. आकाश सुभाष भिसे वय २१ रा. वाल्हेकर चौक, नन्हे, मूळ-पाथरी जि.परभणी भागवत मुंजाजी आसुरी (वय २० सिध्दी चौक, नन्हे ) रितेश उत्तम जोगदंड (वय २१ रा. नन्हे मुळ- पेडगाव परभणी ) उमेश ऊर्फ भैय्या रामभाउ शेळके (वय २१ मुळ-पेडगाव परभणी ) पांडूरंग भानुदास सोनवणे (वय १९ रा. रा. हटटा, पो.कुपटा, ता.सेलू जि.परभणी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पानशेत परिसरात पर्यटनासाठी गेलेले ५ जणांचे टोळके नंदाबाई कुंभार मावशीच्या हॉटेलसमोर सिगारेट ओढत थांबले होते. त्यावेळी स्थानिक तरूण रोहिदास काटकर याने त्यांना सिगारेट ओढण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांच्या किरकोळ वादावरून टोळक्याने रोहिदासला बेदम माराहाण करून त्याच्य छातीवर दगड मारला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्यानंतर टोळके दोन दुचाकीवर पुण्याच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी अविदास काळुराम काटकर वय २३ यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांनी घटनास्थळी भेट देउन तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळावरील माहितीचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित काळ्या रंगाची अ‍ॅक्टीव्हा व स्प्लेंडर दुचाकीवरून गेल्याचे दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेतला असता, संशयीत दोन्ही मोटार सायकल नन्हे आंबेगाव बाजूकडे गेल्या असल्याचे दिसून आले. दुचाकी क्रमांकानुसार पोलिसांनी मालक गणेश नवघरे यांना संपर्क करून चौकशी केली. त्यावेळी त्यांची दुचाकी मित्र आकाश सुभाष भिसे याने नेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने आकाश भिसे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने रोहिदास काटकर याला बेदम मारहाण करीत दगड मारल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने इतर आरोपींनीही ताब्यात घेत अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, एपीआय राहुल गावडे, उपनिरीक्षक अमित देशमुख, सचिन घाडगे, अजित भुजबळ, मंगेश भगत, विनोद भोकरे, हनुमंत पासलकर, अतुल डेरे, अमोल शेडगे, रामदास बाबर, राहुल घुबे, प्रसन्न घाडगे, अंमलदार ज्ञानदीप धीवार, पंकज मोघे, आकाश पाटील, राजेंद्र आवदे, अजय गार्डी, सोमनाथ जाधव, युवराज सोमवंशी यांनी केली.

सिगारेट ओढू नका म्हटल्याने केला खून

आरोपी तरूण हे १५ जूनला पानशेत धरणाकडे फिरण्यासाठी गेले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास माघारी येत असताना, आरोपी हे पानशेतमधील नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेलसमोर थांबून सिगारेट ओढत होते. त्यामुळे रोहीदास काटकर यांनी त्यांना सिगारेट ओढू नका असे बजावले. त्यामुळे त्यांच्यात भांडण होउन मारामारी झाली. त्यानंतर टोळक्याने भांडणामध्ये रोहीदासच्या छातीवर दगड मारल्याने तो गतप्राण झाला. त्यानंतर आरोपी दोन्ही मोटार सायकलवर बसून निघून गेले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×