रिक्षा प्रवासी महिलेचे पावणेचार लाखांचे दागिने चोरीला

हडपसरमधील सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रिक्षा प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी तीन लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

रिक्षा प्रवासी महिलेचे पावणेचार लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळच्या बारामतीतील आहेत. महिला आणि त्यांचे पती कामानिमित्त १७ डिसेंबर पुण्यात आले होते. शिवाजीनगर भागातून त्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास रिक्षातून स्वारगेट एसटी स्थानकाकडे निघाल्या. महिलेने पिशवीत एका डब्यात दागिने ठेवले होते. प्रवासादरम्यान त्यांच्या पिशवीतून दागिने चोरण्यात आले. स्वारगेट एसटी स्थानक परिसरात त्या रिक्षात उतरल्या. काही वेळानंतर त्यांनी पिशवीची पाहणी केली. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस कर्मचारी मासाळ तपास करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी हिसकावली

कात्रजमधील आंबेगाव परिसरात ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे आंबेगाव परिसरात राहायला आहेत. २४ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ते जांभुळवाडी रस्त्यावर बसची वाट पाहत थांबले होते. दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. अंधारात चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×