Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

संशयित दहशतवादी जुबेरचे अफगाणिस्तान, हाँगकाँग कनेक्शन

फॉरेन्सिकच्या प्राथमिक अहवालातात माहिती उघडकीस

marathinews24.com

पुणे – दहशतवादी ओसमा बिन लादेनच्या अल-कायदा दहशतवादी संघटनेच्या विचार सरणीशी संबंधित असलेल्या जुबेर इलीयास हंगरगेकर याचे अफगानिस्तान, हाँगकाँग कनेक्शन उघडकीस आले आहे. फॉरेन्सीकच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती आढळून आली आहे. त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉपचे विश्लेषण केल्‍यानंतर माहिती तपास यंत्रणाच्या हाती लागली आहे. त्यामुळे आता संबंधित यंत्रणांनी आणखी तपासाला गती दिली आहे.

इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून पडल्याने मजुर जखमी – सविस्तर बातमी

जुबेरच्या टेलीग्राम ग्रुपमधील १०२ आयडी पैकी ४ आयपी ॲड्रेस मिळाले आहे. त्यातील तीन आयपी ॲड्रेस हे अफगाणिस्‍ताने तर एक आयपी ॲड्रेस हॉगकॉगचा आहे. त्यामुळे जुबरचे पडघा गावाशी असलेले कनेक्‍शनही उघड झाले आहे. राष्ट्रविरोधी कृत्‍यात सामील असल्‍याच्‍या संशयावरून अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत गेलेल्‍या जुबेरला पुन्‍हा राज्‍य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेत अटक केली आहे. त्‍याला ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी दिले आहेत. जुबेरला दि. २७ ऑक्‍टोबर २०२५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्‍या सुमारास त्याला पुणे रेल्‍वे स्‍थानकातून अटक करण्यात आली होती. त्‍यानंतर त्‍याला १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीचे हक्‍क अबाधीत ठेवून पुन्‍हा अटक झाली आहे.

जुबेरच्या संपर्कातील एकाने २८ ऑक्टोबरला कोंढव्यातील सभेत संशिय पुस्तके वाटली होती. त्यानंतर ती पुस्कते व इतर काही कागदपत्रे काळेपडळ येथील मदरशाच्या जागेत जाळली. तसाप यंत्रणांनी ती जागा शोधून काढली. जुबेरने तपास यंत्रणांना जेथे त्यांचे ब्रेनवॉश केले जात असे ती जागा देखील दाखवून दिली. त्याला २०१५ मध्ये अबु अनस नावाचा व्यक्‍तीने खिलापत व इसीसचे व्हीडीओ दाखविले होते. २०२१ मध्ये मुलांच्‍या फिजीकल, स्पोर्ट ॲक्‍टीव्‍हीटी कॅम्प ठाण्यातील पडघा येथे घेतले होते ते ठिकाण त्‍याने दाखविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×