मनी लॉड्रींग केसच्या बतावणीने जेष्ठाला १९ लाखांचा गंडा

एमएनजीएल मीटर अपडेटच्या बहाण्याने जेष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – टेलिकॉम डिपार्टमेंट ऑफ इंडियामधून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला मनी लॉड्रींगची केस असल्याचे सांगितले. चौकशीच्या बहाण्याने तब्बल १९ लाख रूपये पाठवण्यास सांगून फसवणूक केली आहे. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आणि बँक धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बाणेररोड परिसरात दुचाकींच्या बॅटरी चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेष्ठ नागरिक तक्रारदार हे वारजे परिसरात राहायला असून, ११ जानेवारी २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. टेलिकॉम डिपार्टमेंट ऑफ इंडियामधून बोलत असल्याची बतावणी केली. जेष्ठ नागरिकाविरूद्ध मनी लॉड्रींगची केस असल्याचे सांगितले. चौकशीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी जेष्ठाला रक्कम पाठवायला भाग पाडले. तब्बल १९ लाख रूपये पाठवल्यानंतर जेष्ठ नागरिकाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×