चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कंपनी बाहेर ठेवलेल्या दुचाकींच्या बॅटर्या आणि चार्जर असा ६० हजारांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना १८ डिसेंबरला बाणेर रस्ता परिसरातील बॅटव्हील्स मोबिलिटी सोल्यूशन्स प्रा. लि. याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी भुगाव परिसरात राहणार्या तरूणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रांजणगाव एमआयडीसीतील गोदामात चोरी; आरोपीला अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेररोड परिसरात बॅटव्हील्स मोबिलिटी सोल्यूशन्स प्रा. लि. कंपनी आहे. कंपनीबाहेर दुचाकींच्या बॅटर्या आणि चार्जर ठेवले होते. १८ डिसेंबरला चोरट्यांनी संबंधित साहित्य चोरून नेले. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अमलदार नितीन चौधरी तपास करीत आहेत.






















