Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

रांजणगाव एमआयडीसीतील गोदामात चोरी; आरोपीला अटक

६८ लाखांचा ऐवज जप्त

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या गोदामातून बिस्कीट, साबण, सिगारेटची चोरी करणार्‍याचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पर्दापाश केला आहे. अवघ्या ७२ तासात गुन्हा उघडकीस आणून तब्बल ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण (रा. वाघोली ता हवेली ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिली आहे.

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे निधन – सविस्तर बातमी

चोरट्यांनी १७ डिसेंबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास रांजणगाव (ता. शिरुर) याठिकाणी असलेल्या चमाडीया गोदाममध्ये सिगारेट, बिस्किट, साबण, सिगारेट असा ६६ लाखांचा माल भरलेल्या पिकअपची चोरी केली. याप्रकरणी दिपक देवदास शिंदे रा लोणीकंद यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चोरट्यांनी पिकअप गोदामापासुन काही अंतरावर सोडुन त्यातुन ५४ लाख ५३ हजारांच्या सिगारेट चोरून नेल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी १०० पेक्षा जास्त सीसीटिव्ही तपासले. त्याचवेळी पोलीस अंमलदार उमेश कुतवळ यांना संबंधित वाहन हे वाघोलीतील कावेरी हॉटेलमध्ये डिलीव्हरी देत असताना दिसून आले. त्यानुसार त्यांनी तपास केला असता, सुपरवायझर प्रथमेश चव्हाण याने आरोपी दिपक ज्ञानेश्वर ढेरंगे व अल्ताफ आयुब मुल्ला यांना वाहन चोरीसाठी दिल्याची कबुली दिली.

पोलिसांनी प्रथमेश चव्हाण याला अटक करीत त्याच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन, सिगारेट असा ६८ लाखांचा ऐवज जप्त केला. दरम्यान, आरोपी दिपक ज्ञानेश्वर ढेरंगे हा रेकॉर्डवरील असुन त्याच्याविरूद्ध शिक्रापुर , सिंहगडरोड, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे ८ गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले सो, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, माणिक काळकुटे, अमोल रासकर यांनी केली.

रांजणगाव एमआयडीसी गोदामातून मालाची चोरी करणार्‍याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील ऐवज जप्त केला असून, साथीदारांच्या शोध घेतला जात आहे. दरम्यान, व्यावसायिकांसह उद्योजकांची सुरक्षितता वाढवणे, खंडणीखोरांविरूद्ध कठोर कारवाई करणे आमचे उदिष्टे असून, त्यादृष्टीने कारवाई केली जात आहे. – संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×