संग्राम थोपटे यांचा निर्णय लोकशाहीत योग्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
Marathinews24.com
पुणे – शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप नोंदवला आहे. सीबीएससी बोर्डात हिंदी सक्तीचा निर्णय घाईघाईत घेतला जात आहे. मी स्वतः स्टेट बोर्डातून शिकले आहे, त्यामुळे स्टेट बोर्डाचे काय होणार हा माझ्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठी ही मुख्य भाषा असलीच पाहिजे, तिचं नुकसान सहन केलं जाणार नाही. असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
त्या पुढे असंही म्हणल्या की, राज्यातील शिक्षणपद्धतीची स्थिती काय आहे हे सरकारने पाहिलं पाहिजे. स्टेट बोर्डातून सीबीएससीकडे वळण्याची तयारी आहे का.? प्रत्येकाला पर्याय हवा असतो. सोयीप्रमाणे निर्णय घेता कामा नये. मराठी भाषा गी मुख्य असली पाहिजे, त्यानंतर कितीही भाषा शिकवा, त्याला आमचा आक्षेप असणार नाही.
त्याच दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चां होत आहे त्यावरही सुळे यांना विचारण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, लोकशाही आहे. माझी आणि संग्राम थोपटे यांची सध्या भेट झालेली नाही. मात्र आमच्यात चांगले संबंध राहिले आहेत. त्यांनी भोर तालुक्यासाठी चांगले काम केले आहे. ते कोणताही निर्णय घेत असतील तर तो बारामतीसाठी योग्य असेल. त्यात वेगळं काही नाही.